१४ एप्रिलपर्यंत ‘या’ ५ राशींच्या नशिबाला पूर्ण कलाटणी? २३ दिवस धनलाभाचे योग, भाग्यात दिसू शकते सूर्यासम तेज

१४ एप्रिलपर्यंत ‘या’ ५ राशींच्या नशिबाला पूर्ण कलाटणी? २३ दिवस धनलाभाचे योग, भाग्यात दिसू शकते सूर्यासम तेज

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य देव हे यश, आत्मविश्वास व प्रगतीचे कारक मानले जातात. सूर्य ग्रहांचा राजा असल्याने अन्य ग्रहांना सूर्याची साथ लाभल्यास त्याचा प्रभाव द्विगुणित होऊ शकतो. सूर्यदेव दर महिन्यात एकदा राशी परिवर्तन करतात, सूर्य ज्या राशीत प्रवेश करणार त्यानुसार त्या महिन्यातील संक्रांत ठरत असते. १५ मार्चला सूर्याने मीन राशीत प्रवेश घेतला होता तर आता १४ एप्रिलपर्यंत सूर्यदेव मीन राशीतच स्थित असणार आहेत. यानंतर सूर्य आपल्या मूळ राशीत म्हणजेच मेष मध्ये प्रवेश घेतील. जिथे अगोदरच बुध व शुक्र स्थिर आहेत. तत्पूर्वी १४ एप्रिल २०२३ पर्यंत म्हणजेच पुढील २३ दिवस काही राशींना सूर्याच्या कृपेतून सोन्याहून पिवळा सुखाचा काळ अनुभवता येऊ शकतो. अशा भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना नका काय फायदा होऊ शकतो हे ही पाहूया..

सूर्य देवाच्या कृपेने ‘या’ राशींचे भाग्य चमकणार?
वृषभ रास (Taurus Zodiac)
सूर्य गोचर होताच वृषभ राशीच्या मंडळींना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. येत्या काळात आपल्याला प्रचंड आर्थिक व मानसिक सुख अनुभवता येऊ शकते. करिअरमध्ये तुम्हाला हवा असणारा बदल होण्याची चिन्हे आहेत. पद- मान प्रतिष्ठा समाजात वाढू शकते. कौटुंबिक सुखाने पुढील प्रत्येक दिवस हा आनंदाचा ठरू शकतो.

मिथुन रास (Gemini Zodiac)
मागील काही कलनपासून तुम्ही ज्या समस्येला वारंवार तोंड देत आहात त्यातून कायमची मुक्ती मिळण्याची संधी आहे. तुम्हाला मान- सन्मान लाभून तुमचे मनोबल वाढू शकते. नोकरदार मंडळींसाठी येणारे २३ दिवस हे अत्यंत शुभ ठरू शकतात. तुम्हाला दैवी चमत्कार नव्हे तर मेहनतीचे पूर्णतः कमावलेले फळ मिळू शकते. तुमच्या सुखाला दिशा गवसण्याचा हा काळ ठरू शकतो.

कर्क रास (Cancer Zodiac)
सूर्य गोचर कर्क राशीच्या मंडळींसाठी लाभदायक ठरू शकते. तुम्ही सुरु केलेल्या सर्व कामांमध्ये तुम्हाला नशिबाची साथ लाभू शकते. कामातील प्रगती व वेग पाहता तुमची आर्थिक स्थिती सुद्धा सुधारण्याची चिन्हे आहेत. नोकरदार व व्यवसायिक दोघांनाही भरपूर लाभ होऊ शकतो.

तूळ रास (Libra Zodiac)
सूर्याचे राशी परिवर्तन होताच तूळ राशीच्या व्यक्तींना आयुष्यात मोठी उपलब्धी लाभू शकते. तुमच्या आयुष्यात अत्यंत अनपेक्षित व महत्त्वपूर्ण बदल घडून आल्याने तुमचे ग्रह पालटू शकतात. आजपर्यंतच्या सर्व समजुती खोदून काढून तुम्हाला एखाद्या गोष्टीवर नव्याने विश्वास ठेवावा लागू शकतो. १४ एप्रिल पर्यंत माता लक्ष्मी आपल्यावर प्रचंड मेहेरबान राहू शकते.

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)
वृश्चिक राशीच्या मंडळींना वैवाहिक आयुष्यात एखादी गोड बातमी समजू शकते. तुम्हाला कुटुंब किंवा काम यापैकी एकाला प्राधान्य द्यावे लागू शकते पण दोन्ही मार्गांनी तुम्ही समृद्ध होऊ शकता. आर्थिक स्थिती भक्कम झाल्याने तुमच्या मनावर ताण राहणार नाही. नशीब व कुटुंबाची साथ लाभू शकते.

Team BM