तब्बल 12 वर्षानंतर ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री छोट्या पडद्यावर करणार कमबॅक; या मालिकेत दिसणार..

तब्बल 12 वर्षानंतर ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री छोट्या पडद्यावर करणार कमबॅक; या मालिकेत दिसणार..

एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री यांनी सुरुवातीच्या काळामध्ये मालिकांत काम केले आणि त्यांना यश मिळाले. त्यानंतर ते लग्न करून स्थिरावतात. अभिनेत्रींच्या बाबतीत हा प्रकार जरा जास्तच होतो. अभिनेत्री यांचे समजा लग्न झाले तर नंतर त्या मालिका किंवा चित्रपटात फारशा येण्यास उत्सुक नसतात.

मात्र, याला काही अपवाद देखील आहेत. आता एक अभिनेत्री तब्बल बारा वर्षानंतर पुन्हा एकदा एका मालिकेत झळकणार आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मधुरा वेलणकर ही होय. आपण बरोबर ऐकले. मधुरा वेलणकर हिने अनेक मालिका आणि चित्रपटात यापूर्वी काम केले आहे.

तिने काम केले सगळे चित्रपट आणि मालिका प्रेक्षकांना खूप आवडले होते. खूप वर्षांपूर्वी तिची झी मराठीवर ‘मृण्मयी’ ही मालिका आली होती. या मालिकेमध्ये तिने अफलातून असे काम केले होते. या मालिकेमध्ये प्रसाद ओक याची भूमिका होती. विक्रम गोखले, शैलेश दातार यांच्यासह इतर अभिनेते व अभिनेत्री देखील यामध्ये होत्या.

प्रसाद ओक याने गावाकडे जाऊन मधुरा हिला पाहिले असते. त्यानंतर त्याचा तिच्यावर जीव येतो आणि तो तिच्या सोबत लग्न करतो. लग्नानंतर आलेल्या अडी अडचणींवर आधारित ही मालिका आहे. ही मालिका त्या वेळेस प्रेक्षकांना खूपच आवडली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही.

त्यानंतर मधुरा हिने चक्रव्यूह या मालिकेत देखील काम केले होते. मधुरा वेलणकर प्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर यांची मुलगी आहे. तसेच ती शिवाजी साटम यांची सून तिचा विवाह शिवाजी साटम यांचा मुलगा अभिजित साटम याच्यासोबत झाला आहे. मधुरा वेलणकर आणि अभिजित साटम यांनी हापूस या चित्रपटात एकत्र काम केले होते.

हा चित्रपटही प्रचंड चालला होता. कोकणाच्या आंब्याच्या राजकारणावर हा चित्रपट आधारीत होता. त्याचप्रमाणे तिने गोजिरी या चित्रपटातही काम केले होते. हा चित्रपटही प्रचंड चालला होता. त्यानंतर खबरदार या चित्रपटातही तिची भूमिका लक्षवेधी होती. या चित्रपटामध्ये भरत जाधव तिच्या सोबत दिसला होता.

आता मधुरा वेलणकर ही पुन्हा एकदा १२ वर्षांनतंर मालिकेत पदार्पण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही मालिका सोनी मराठीवर येत असून या मालिकेचे नाव ‘तुमची मुलगी काय करते’ असे आहे. या मालिकेमध्ये मधुरा वेलणकर हिने एका शिक्षिकेची भूमिका साकारली आहे.

ती देखील एक आई आहे. या मालिकेत मुलांवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आपली मुलं हे काय करतात याकडे लक्ष ठेवावे, असे या मालिकेतून संदेश देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. या मालिकेमध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये अभिनेता हरीश हा दिसणार आहे.

लवकर ही मालिका सोनी मराठीवर सुरू होणार आहे, तर आपण मधुरा हिला या मालिकेत पाहण्यास उत्सुक आहात का? आम्हाला नक्की सांगा.

Team Beauty Of Maharashtra