११८ दिवस गुरु मीन राशीत वक्री: पुढील ३.५ महिने ‘या’ ६ राशींना सर्वोत्तम; धनलाभ, सुखाचा काळ

११८ दिवस गुरु मीन राशीत वक्री: पुढील ३.५ महिने ‘या’ ६ राशींना सर्वोत्तम; धनलाभ, सुखाचा काळ

ज्योतिषशास्त्रात, देवगुरू बृहस्पती देवांचे गुरु मानले गेले आहेत. ज्ञान, विज्ञान, विद्या, सौभाग्य यांचे स्वामीत्व गुरुकडे असल्याचे सांगितले जाते. नवग्रहांपैकी महत्त्वाचा मानला गेलेला गुरु शिक्षण, पैसा, कौटुंबिक आनंद, समाधान अशा गोष्टींवर प्रभाव पाडणारा असतो, असे म्हटले जाते.

आताच्या घडीला गुरु स्वराशीत म्हणजेच मीन राशीत विराजमान आहे. एप्रिल २०२२ रोजी गुरुने आपलेच स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश केला होता. आता २९ जुलै २०२२ रोजी गुरु याच मीन राशीत वक्री होणार आहे. तर तब्बल ११८ दिवसांनी २४ नोव्हेंबर २०२२ रोजी गुरु मीन राशीत मार्गी होईल.

ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाचा संबंध ज्ञान, वाढ, शिक्षक, संतती, शिक्षण, संपत्ती, दान आणि पुण्य यांच्याशीही संबंध असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गुरू ग्रहाच्या वक्री प्रभावाचा सर्व राशींवर परिणाम होईल. गुरु वक्री होण्याचा जगावर परिणाम होईल, असे सांगितले जात आहे.

मात्र बारापैकी ६ राशीच्या व्यक्तींना गुरुच्या या वक्री चलनाचा उत्तम लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना गुरु वक्री होण्याचा काळ लाभदायक ठरू शकेल, ते जाणून घेऊया…

वृषभ राशीच्या व्यक्तींना गुरुचे वक्री चलन उत्पन्नात वाढ करणारे ठरू शकते. घरगुती वस्तूंच्या खरेदीवर पैसे खर्च होऊ शकतील. तुमच्या इच्छा पूर्ण होई शकतील. भावंडांशी मतभेद असल्यास ते लवकरच दूर होतील. करिअरच्या क्षेत्रात तुम्ही नवीन उंची गाठू शकता. नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच रोजगार मिळू शकतो. जर तुम्ही परदेशात याशी संबंधित कोणताही व्यवसाय केलात तर तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो.

कर्क राशीच्या व्यक्तींना गुरु वक्रीचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकेल. सासरच्या लोकांशी तुमचे संबंधही सुधारतील. काही व्यक्ती अध्यात्मिक कार्यातही भाग घेऊ शकतात. सहलीला जाण्याची संधी मिळू शकते. तुम्ही सामाजिक कार्य केले तर तुमच्या मदतीचा फायदा अनेकांना होऊ शकतो.

कन्या राशीच्या व्यक्तींना गुरु वक्रीचा कालावधी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमचे उत्पन्न दिवसेंदिवस वाढत जाऊ शकेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. जोडीदारासोबत व्यवसाय सुरू करायचा असेल तर या काळात तुम्ही योग्य दिशेने पावले टाकू शकता. तथापि, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपण आपल्या पालकांशी बोलणे आवश्यक आहे. भागीदारीत व्यवसायात दुपटीने वाढ होऊ शकते.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गुरुचे वक्री चलन अनुकूल ठरू शकेल. विद्यार्थी वर्गातील लोकांना पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे चांगले फळ मिळेल. आरोग्यामध्ये चांगले बदल दिसून येतात. काही लोकांना मातृपक्षाच्या लोकांकडून आर्थिक लाभ होईल. यावेळी तुमची बौद्धिक क्षमता वाढेल, ज्यामुळे तुम्हाला करिअरच्या क्षेत्रात चांगले परिणाम मिळू शकतात.

कुंभ राशीच्या व्यक्तींना गुरुचे वक्री चलन यशकारक ठरू शकते. आर्थिक बाबतीत यश मिळू शकते. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. भावंडांचे सहकार्य मिळेल. मात्र, आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला थंड पदार्थ खाणे टाळावे लागेल. या काळात शत्रूंवर विजय मिळवण्यात यशस्वी होऊ शकाल.

आताच्या घडीला गुरु स्वराशीत विराजमान आहे. या राशीत गुरु ११८ दिवस वक्री आहे. तुम्हाला गुरुचा शुभ प्रभाव मिळत राहील. नोव्हेंबरपर्यंत प्रगती आणि लाभ मिळविण्यासाठी तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. तुमचा पैसा धार्मिक आणि शुभ कार्यात खर्च होईल. प्रवासाचा योग येतील. पूर्वी केलेली गुंतवणूक तुम्हाला नफा देईल. यावेळी तुम्ही अल्प मुदतीची गुंतवणूक टाळावी, दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे फायदा होईल. शैक्षणिक क्षेत्रात तुमची कामगिरी चांगली राहील.

जगाच्या अर्थव्यवस्थेत घसरण, दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल होण्यासारख्या काही घटना या कालावधीत घडू शकतात. गुरू वक्रीचा आर्थिक बाबींवरही मोठा परिणाम दिसून येऊ शकेल.

सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, गुरुचा मीन राशीत वक्री होण्याचा तुमच्यावरील परिणाम जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

Team Beauty Of Maharashtra