१ जानेवारी पासून गुरु ‘या’ ३ राशींना देणार प्रचंड धनलाभाची संधी; ६ महिने अमाप पैसे कमावू शकतील ‘ही’ मंडळी

2023 मध्ये अनेक ग्रह हे आपले स्थान बदलून विविध राशींमध्ये गोचर करणार आहेत परिणामी जानेवारी महिन्यापासूनच राशीचक्रातील सर्वच राशींवर मोठा प्रभाव दिसून येणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कोणताही ग्रह आपले स्थान बदलून अन्य राशीत मार्गक्रमण करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम त्या राशीवर होतो इतकेच नव्हे तर हा ग्रह ज्या स्थानी स्थिर होणार आहे त्यानुसार विविध राशींमध्ये भाग्योदयाचे योग जुळून येतात. २०२३ या नववर्षात १७ जानेवारीला शनीचे वर्षातील सर्वात मोठे गोचर होणार आहे पण तत्पूर्वीच तीन राशींच्या भाग्यात धनलाभ व संपत्ती वाढीचे योग आहेत.
गुरु ग्रह येत्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारीला मेष राशीत मार्गी होणार आहे ज्योतिष शास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार पुढील सहा महिने गुरु मेष राशीत विराजमान असणार आहे. १७ मे ला गुरु मेष राशीतून वृषभ राशीत मार्गी होईल व मग पुढील सहा महिन्यांसाठी म्हणजेच ३१ डिसेंबरपर्यंत गुरु वृषभ राशीत असणार आहे. गुरु ग्रहाच्या संक्रमणामुळे तीन राशींचा अत्यंत लाभदायक असा काळ सुरु होत आहे. या राशी कोणत्या व त्यांना गुरु गोचराचा नेमका कसा लाभ होणार हे आता आपण जाणून घेउयात..
पुढील सहा महिन्यात ‘या’ तीन राशी होऊ शकतात मालामाल…
सिंह
सिंह राशीच्या मंडळींसाठी गुरुचे गोचर अत्यंत शुभ ठरू शकते. गुरु तुमच्या कुंडलीत विवाह स्थळी विराजमान होत आहे याचा अर्थ असा की प्रेमाच्या संबंधित कोणतेही निर्णय घेण्यासाठी पुढील सहा महिने हे अनुकूल ठरू शकतात. जोडीदाराच्या माध्यमातूनच आपल्याला आर्थिक लाभाचे योग आहेत. अनपेक्षित पण घवघवीत यश तुम्हाला लवकरच लाभण्याची शक्यता आहे. तुम्ही जिभेवर साखर ठेवून म्हणजेच इतरांशी गोड बोलून आपले काम पूर्ण करून घेऊ शकता. वादात पडणे टाळा.
कन्या
कन्या राशीसाठी गुरु मोठा धनलाभ घेऊन येऊ शकतो. बँकेचे व्यवहार तुम्हाला काळजीपूर्वक करण्याची गरज आहे. योग्य सल्लागाराच्या मदतीने आपण बँक गुंतवणुकीतूनच मोठा लाभ मिळवू शकता. कमी मेहनत व अधिक लाभ असा फायद्याचा काळ तुमची वाट पाहत आहे. वैवाहिक जीवनात मतभेद झाल्यास तुम्हाला कमीपणा घ्यावा लागू शकतो पण असे करणे तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते.
तुळ
तूळ राशीसाठी गुरु ग्रहाचे गोचर लाभदायक ठरू शकते. गुरु ग्रह आपल्या कुंडलीत ११ व्या स्थानी स्थिर होणार आहे हे स्थान आर्थिक लाभाचे मानले जाते. पुढील सहा महिन्यांमध्ये आपल्याला मोठा आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. नोकरीत काहीसे बदलाचे योग आहेत, तुम्हाला नव्या नोकरीचा प्रस्ताव आल्यास तो स्वीकारणे हिताचे ठरू शकते. समाजात तुमचा मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे.