ही ठरली महाराष्ट्राची नंबर ‘१’ अभिनेत्री

ही ठरली महाराष्ट्राची नंबर ‘१’ अभिनेत्री

मालिकांमध्ये नेहमीच टीआरपीची रेस चालू असते . मालिकांच्या क्षेत्रात वेगवेगळ्या मालिकांचे नाव क्रमांक एक च्या स्थानावर येत असते. परंतु यात सर्वात जास्त काळ नंबर एक च्या स्थानावर राहणारी मालिका आई कुठे काय करते होय ,परंतु गेल्या काही दिवसांत आता यातही बदल होताना दिसत आहे

ज्याप्रमाणे मालिकांमधील टीआरपीची रेस चालू असते त्याच प्रमाणे मराठी मालिकांमधील अभिनेत्रींमध्ये देखील ही स्पर्धा चालू असते. आज देखील आपण या संदर्भात माहिती घेणार आहोत कोणत्या अभिनेत्रीने महाराष्ट्राचे 1 चा क्रमांक पटकावला आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

यात क्रमांक 5 फुलाला सुगंध मातीचा मधील समृद्धी केळकर आहे.

नंबर 4 सुख म्हणजे नक्की काय असते मालिकेतील गिरीजा प्रभू आहे या मालिकेत आता नवीन वळण आले असून लवकरच गौरी एक आनंदाची बातमी शिर्के पाटील तसेच प्रेक्षकांना देखील देणार आहे.

नंबर 3 प्रार्थना बेहरे, ही माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेत काम करत असून या मालिकेने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

क्रमांक 2 ठिपक्यांची रांगोळी ,ज्ञानदा रामतीर्थकर.

क्रमांक 1 ऋता दुर्गुळे, मन उडू उडू झालं या मालिकेत गेल्या काही दिवसापासून रंजक वळणावर आले असून दीपक आता तिच्या ताईला चांगले वागण्यास प्रवृत्त करणार आहे त्यामुळे ही मालिका अधिकच रंजक वळणावर आली आहे ऋता दुर्गुळे नेहमी च उत्कृष्ट अभिनयामुळे चर्चेत राहिली आहे .

Team Beauty Of Maharashtra