‘रामायण’ या मालिकेनंतर संपुष्टात आली होती अरुण गोविल यांची कारकीर्द, या कारणांमुळे निर्मात्यांनी दिले नाही काम

‘रामायण’ या मालिकेनंतर संपुष्टात आली होती अरुण गोविल यांची कारकीर्द, या कारणांमुळे निर्मात्यांनी दिले नाही काम

लॉकडाऊन असल्या कारणाने ‘रामायण’ ही मालिका पुन्हा नव्याने प्रसारित केली जात आहे आणि लोक ही मालिका तेवढ्याच उत्सहानी पाहत आहेत. ‘रामायण’ या मालिकेच्या पुनः प्रसारणामुळे या मालिकेत काम करणारे कलाकारही पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले आहेत. प्रत्येकजण त्यांच्या जीवनाबद्दल माहीत करून घेऊ इच्छितो. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत भगवान रामाची भूमिका साकारणारे अभिनेता म्हणजेच अरुण गोविल हे 80 च्या दशकातील एक प्रसिद्ध आणि ओळखीचा चेहरा होते. अरुण गोविल हे ‘रामायण’ या मालिकेमुळेच लोकांमध्ये ओळखले जाऊ लागले. तथापि, इतके प्रसिद्ध झाल्यानंतरही त्यांना फारसे काम मिळू शकले नाही. वास्तविक, रामायणात, श्री रामची भूमिका अरुण गोविल यांनी इतक्या चांगल्या प्रकारे केली होती की लोकांनी त्यांना भगवानचा दर्जा दिला होता आणि याच दर्जेमुळे, निर्मात्यांपैकी कोणत्याही निर्मात्याने त्यांची पुढे निवड केली नाही. अरुण गोविल यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना हा खुलासा केला आणि सांगितले की निर्माते त्याची निवड करू इच्छित नव्हते आणि इच्छा असूनही ते बॉलिवूडमध्ये परत येऊ शकले नाही. अरुण गोविल यांच्या म्हणण्यानुसार, “मी हिंदी चित्रपटात नायक म्हणून माझ्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. मग मी ‘रामायण’ केले ज्यामध्ये मी श्रीराम बनलो. रामायणानंतर मी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याचा विचार केला. पण निर्माते म्हणायचे, ‘तुमची श्री रामवाली प्रतिमा खूप मजबूत आहे, आम्ही तुम्हाला इतर कुठल्याही पात्रासाठी निवडू शकत नाही किंवा सहाय्यक अभिनेत्याची भूमिका देऊ शकत नाही.”

अरुण गोविल यांच्या म्हणण्यानुसार त्यांची श्रीराम वाली प्रतिमा इतकी मजबूत होती की ते व्यावसायिक चित्रपटासाठी फिट बसत नव्हते. अरुण गोविल म्हणाले की, रामायणात काम करणे हे माझी कारकीर्द संपुष्टात येण्याचे सर्वात मोठे कारण होते आणि मला जाणवले की मी कधीही शोबिजमध्ये परत येऊ शकणार नाही, जसे की मी इच्छित होतो. लोक राम म्हणायचे – अरुण गोविल यांना रामायण केल्यानंतर काही मालिकांमध्ये काम करायची संधी मिळाली. पण जेव्हा जेव्हा त्यांनी या मालिकांमध्ये काम केले तेव्हा त्यांना राम असे म्हटले जायचे. अरुण गोविल यांच्या म्हणण्यानुसार, मी काही टीव्ही कार्यक्रम केले, परंतु प्रत्येक वेळी मी असे काहीतरी करायचो की लोक मला टोकायचे, ‘अहो, श्री राम! आपण हे काय करत आहात.

रामायणामुळे कारकीर्द संपुष्टात आली – अरुण गोविल यांचा असे वाटते की लोकांमध्ये त्यांची ओळख रामायणामुळेच निर्माण झाली आणि लोकांकडून त्यांना अपार प्रेम आणि आदर मिळाला. पण याच मालिकेमुळे त्यांची कारकीर्द ठप्प झाली. रामायण या मालिकेनंतर अरुण गोविल फिल्मी जगात पुनरागमन करू शकले नाही. पुन्हा झाले प्रसिद्ध – लॉकडाऊनमुळे पुन्हा रामायण ही मालिका प्रसारित होत असून अरुण गोविल पुन्हा एकदा प्रसिद्ध झाले आहेत. इतक्या वर्षांनंतरही श्रीराम यांच्या व्यक्तिरेखेमुळे त्यांना लोकांचे भरपूर प्रेम मिळत आहे. अर्थात, ते प्रसिद्ध अभिनेते होऊ शकले नाही. पण श्रीरामच्या व्यक्तिरेखेसाठी त्यांना लोकांकडून मिळालेले प्रेम अनमोल आहे आणि बहुधा कोणत्याही अभिनेत्याला इतके प्रेम मिळालेले नाही. अरुण गोविलमध्ये लोक रामाची प्रतिमा पाहतात.

Team Beauty Of Maharastra