धक्कादायक ! मराठीतील या प्रसिद्ध कलाकाराच्या वडिलांचे झाले निधन

धक्कादायक ! मराठीतील या प्रसिद्ध कलाकाराच्या वडिलांचे झाले निधन

गेल्या दीड-दोन वर्षांपासून मराठी चित्रपट सृष्टीला अनेक झटके बसलेले आहेत. तसेच बॉलिवूड मध्येही अनेक जणांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले आहे. आता मराठीतील एका सुप्रसिद्ध कलाकार यांचे वडील देखील हे जग सोडून गेलेले आहे.

काही दिवसांपूर्वीच आपण प्रसिद्ध कला दिग्दर्शक लीलाधर सावंत यांचे निधन झाल्याचे ऐकले असेल. तर सावंत यांनी आजवर जवळपास 177 चित्रपटाचे कला दिग्दर्शन केले होते. त्यांनी क्रांतिवीर, शहंशाह, मै खिलाडी तु आनाडी, सागर, सलाखे, हंड्रेड डेज यासारख्या चित्रपटाचे कला दिग्दर्शन केले होते.

लीलाधर सावंत हे वाशिम जिल्ह्यातील जऊळका येथील रहिवासी होते. सावंत यांनी मुंबईत सुरुवातीला दिग्दर्शकाकडे सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन हा त्यांना पुरस्कार देऊन गौरविले होते.

मात्र, शेवटच्या दिवसांमध्ये अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये असल्याचे सांगण्यात येते. सावंत यांना एक मुलगा होता. त्याचे 14 वर्षांपूर्वी मुंबईत निधन झाले होते. त्या मुलाचे नाव विशाल असे होते. तो देखील आपल्या वडिलांप्रमाणेच बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी गेला होता. मात्र, कॅन्सरच्या आजाराने त्याचे निधन झाले होते.

त्यामुळे लीलाधर सावंत हे आपल्या मूळ गावी परत आले होते .तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. आपण प्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे यांना ओळखत असाल. मिलिंद इंगळे यांनी काही वर्षापूर्वी गारवा अल्बम केला होता. त्यांचा गारवा अल्बम आजही तेवढाच लोकप्रिय आहे.

त्यानंतरही ते अनेक मालिका आणि चित्रपटाला संगीत देत असतात. मिलिंद इंगळे यांना संगीताचा खूप मोठा वारसा लाभलेला आहे. त्याचे वडील हे ग्वाल्हेर घराण्याचे मोठे गायक होते. मिलिंद इंगळे यांनी ज्यावेळेस गारवा अल्बम केला त्यावेळेस त्या अल्बम वर खूप उड्या पडल्या होत्या. हातोहात या अल्बमचे कॅसेट आणि सीडी देखील विक्री झाल्या होत्या.

त्यानंतर त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली होती. कवी सौमित्र यांच्या सोबत त्यांनी अनेक कार्यक्रमांमधून आपल्या गाण्याची चुणूक दाखवली होती. मिलिंद इंगळे यांचे वडील पंडित माधव इंगळे हे ग्वाल्हेर घराण्याचे मोठे गायक होते. माधव इंगळे यांचे नुकतेच पुण्यामध्ये निधन झाले. माधव इंगळे 88 वर्षाचे होते.

त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा सून, नातू असा परिवार आहे. इंगळे यांनी आपल्या गायकीचे शिक्षण वडील केशव राव इंगळे यांच्याकडे घेतले होते. त्यांनी हिंदी मराठी भजन आणि ठुमरी या प्रकारांमध्ये प्राविण्य मिळवले होते. तसेच त्यांनी इतर प्रकारांमध्ये देखील गायन केले आहे. त्याच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. प्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे यांचे ते वडील होते.

Team Beauty Of Maharashtra