या मराठमोळ्या अभिनेतेच्या निधनानंतर पत्नीची ही ‘अवस्था’

या मराठमोळ्या अभिनेतेच्या निधनानंतर पत्नीची ही ‘अवस्था’

आपल्या चतुरुस्त अभिनयाने मराठी मालिका, नाटक, चित्रपट या सर्व क्षेत्रांमध्ये जबरदस्त असा अभिनय करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पाठवणे यांचे मुंबईमध्ये काही दिवसापूर्वी निधन झाले. गिरगाव येथील राहत्या घरी त्यांनी अंतिम श्वास घेतला. मृत्युसमयी त्यांचे वय 65 वर्षाचे होते.

त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. सोशल मीडिया तसेच मराठी मालिका विश्वातील अनेक कलाकारांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. मोरूची मावशी या नाटकातील त्यांचे काम अतिशय उल्लेखनीय असे होते.

त्यांनी या नाटकामध्ये खूप चांगले काम करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. या नाटकांमध्ये भरत जाधव, विजय चव्हाण, विजय पाटकर यांच्यासारखे जेष्ठ कलाकार होते. नवरा माझा नवसाचा या चित्रपटातही त्यांनी जबरदस्त काम केले होते. या चित्रपटामध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका केली होती.

काही दिवसांपूर्वी प्रदीप पटवर्धन यांचा मुलगा क्षितिज याने देखील आपल्या वडिलांच्या निधनबाबत सोशल मीडियावर भाऊ पोस्ट केली होती. माझे वडील माझ्यासाठी सगळे काही होते. माझे वडील आता माझ्यासोबत नाही आहेत. मात्र, ते निघून गेल्यानंतर मला खूप मोठा धक्का बसला आहे, असे त्याने म्हटले होते.

त्याचबरोबर या दुःखामध्ये मला ज्यांनी आधार दिला त्या सगळ्यांचे मी आभार मानतो, असे देखील त्याने सांगितले होते. क्षितिज हा देखील मनोरंजन क्षेत्राशी संबंधितच आहे. या क्षेत्रामध्येच तो सह दिग्दर्शक म्हणून काम करत असतो. त्याच्याकडे देखील अनेक चित्रपटाचे सध्या काम असल्याचे बोलले जात आहे.

आता प्रदीप पटवर्धन यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी सुवर्णा यांची देखील एक पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहे. प्रदीप पटवर्धन यांनी काही वर्षांपूर्वी सुवर्णा जाधव यांच्याशी लग्न केले होते. मात्र, मुलाचा जन्म झाल्यानंतर काही वर्षांनी या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हे दोघेही वेगळे राहत होते.

प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाल्यानंतर सुवर्णा यांनी देखील अतिशय भाऊक पोस्ट लिहिली आहे. माझे पूर्वाश्रमीचे पती आणि माझ्या मुलाचे वडील यांचे निधन झाले आहे. ते खूप उत्तम अभिनेते होते. नाटक चित्रपट आणि सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यांच्या निधनानंतर मी खरोखरच खूप दुःखी झाली आहे. ते माझे चांगले मित्र देखील होते.

अनेकदा त्यांनी मला अडचणीत साथ देखील दिली, असे म्हणताना त्यांनी प्रदीप पटवर्धन यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. प्रदीप माझ्या कायम स्मरणात राहतील, असेही सुवर्णा यांनी सांगितले आहे.

Team Beauty Of Maharashtra