मराठी मालिका विश्वाला मोठा धक्का ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा अपघात

भारतातील सर्वात मोठे उद्योगपती असलेले सायरस मिस्त्री यांचा रस्ते अपघातामध्ये नुकताच मृत्यू झाला आहे. त्यांच्या मर्सडीज कारने पुलावरील कठड्याला धडक दिली. यातच त्यांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा देखील रस्ते अपघातात नुकताच मृत्यू झाला होता.
याचा फटका अनेक अभिनेता आणि अभिनेत्रींना देखील बसला आहे. सामान्य माणसाला तर अपघाताचा फटका बसतोच. मात्र, सेलिब्रिटीला अपघात झाला तर त्याची चर्चाही अधिक होत असते. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला एका बाईक स्वराने धडक दिली आहे. या अभिनेत्रीची नाव शुभांगी सदावर्ते असे आहे.
मराठी सिनेसृष्टीमध्ये दोन अभिनेत्रींच्या आयुष्यात एकाच वेळी एक आनंदाची बातमी आली आहे. शुभांगी सदावर्ते व मानसी जोशी यांना एक सुखद धक्का बसला आहे. मानसी आणि शुभांगी संगीत देव बाभळी या नाटकात काम करत आहेत. त्यांच्या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम असा प्रतिसाद देखील मिळत आहे. या नाटकाचे अनेकांनी कौतुक देखील केले आहे.
संगीत देव बाभळी हे नाटक मुंबई विद्यापीठाच्या बीए च्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. याबाबतची बातमी शुभांगी हिनेच आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. प्राजक्ता देशमुख लिखित दिग्दर्शित या नाटकाची निर्मिती प्रसिद्ध निर्माते प्रसाद कांबळी यांनी केली आहे. कांबळी यांच्या भद्रकाली प्रोडक्शन या नाटकाचे सर्व काही निर्मित केला आहे.
या नाटकाचे अनेक दिग्गज कलाकारांनी देखील तोंड भरून कौतुक केले आहे. या नाटकामध्ये मानसीने रूखमाईची भूमिका साकारली आहे, तर शुभांगी हिने अवली ही व्यक्तिरेखा साकारली आहे. मुंबई विद्यापीठाच्या बीए अभ्यासक्रमाच्या मराठी विषयांमध्ये संगीत देव बाभळी हे नाटक अभ्यासक्रमाला असेल. 2022 पासून हा अभ्यासक्रम असेल.
प्रसिद्ध पॉपुलर प्रकाशनने संगीत देवबाभळी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. शुभांगी सदावर्ते ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चहात्यांना ती अनेकदा माहिती देखील देत असते. आता देखील शुभांगी हिने एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टानुसार तिला एका बाईकस्वाराने जोरदार धडक दिली. त्यानंतर तिला खूप दुखापत झाली.
मात्र, ती रुग्णालयात न जाता थेट घरी आली आणि जिथे मार लागला तिथे तिने हाताला हळद लावली आणि सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले की, माझा अपघात झाला आणि हाताला हळद लागली. त्यामुळे ती घरगुती उपचार घेत आहे. एकूणच काय तर मराठी चित्रपट सृष्टीतील ही आघाडीची अभिनेत्री अपघातामुळे सध्या आरामच करणार आहे.