मराठमोळे अभिनेते ‘अभिजीत चव्हाण’ यांच्या मुलींना पाहिले आहे का ? दिसायला दोघी आहेत एकदम सेम-टू-सेम

मराठमोळे अभिनेते ‘अभिजीत चव्हाण’ यांच्या मुलींना पाहिले आहे का ? दिसायला दोघी आहेत एकदम सेम-टू-सेम

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक असे कलाकार आहेत की, जे आपल्याला एकदा पाहिल्यानंतर आवडून जातात. यामध्येच अभिजीत चव्हाण यासारख्या अभिनेत्याचा समावेश आहे. अभिजीत चव्हाण यांनी मराठी नाटक, चित्रपट, मालिका, या सगळ्या क्षेत्रात आपल्या आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

अभिजीत चव्हाण हे अतिशय लोकप्रिय असे अभिनेते आहेत. अभिजीत चव्हाण यांनी अनेक चित्रपट आणि मालिकात देखील काम केले आहे. उंच माझा झोका गं या नाटकामध्ये त्यांनी अतिशय लोकप्रिय भूमिका साकारली होती. कुछ मिठा हो जाये या नाटकातही त्यांनी अतिशय जबरदस्त असे काम केले होते. त्याचप्रमाणे गांधी आंबेडकर यामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अतिशय जबरदस्त अशी भूमिका केली होती.

या नाटकाचे दिग्दर्शन प्रफुल्लचंद दिघे यांनी केले होते, तर चार चौघी आणि यदाकदाचित यासारखे नाटकेही त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवून सोडले होते, तर मराठी चित्रपटाचे म्हणायचे झाले असे रॉकी हँडसम या चित्रपटातील त्यांची फ्रान्सिस ही भूमिका लोकप्रिय ठरली होती. त्याचप्रमाणे व्हेंटिलेटर या चित्रपटातील त्यांची भूमिका लोकप्रिय ठरली.

राजेश मापुस्कर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, तर अकबर बिरबल यासारख्या मालिकेमध्ये देखील त्यांनी अतिशय जबरदस्त काम केले. बिग मॅजिक या वाहिनीवर ही मालिका लोकप्रिय ठरली होती. तर आंबट गोड, कॉमेडीची बुलेट ट्रेन यासारख्या कॉमेडी शो आणि रियालिटी शोमध्ये देखील त्यांनी काम केले. याशिवाय त्यांनी अनेक चित्रपट मालिकातही काम केले.

गेल्यावर्षीच्या सुमारास एक थी बेगम ही वेब सिरीज मॅक्स प्लेअर वर आली होती. या वेब सिरीज मध्ये देखील त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची अतिशय जबरदस्त भूमिका साकारली होती. त्यांच्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक देखील केले होते. अभिजीत चव्हाण चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यांच्या बाबतीतला एक व्हिडिओ सध्या नुकता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये ते आपल्या मुलींसोबत दिसत आहेत. आपल्या मुलींसोबत ते अतिशय मनमोकळेपणाने राहतात. मुली देखील त्यांच्या अतिशय गोंडस अशा असून त्या देखील सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि आपल्या वडीला सोबतचे फोटो देखील त्या सोशल मीडियावर शेअर करताना दिसत असतात.

अभिजीत चव्हाण यांना खऱ्या आयुष्यामध्ये दोन मुली आहेत. या दोन मुलींची नावे अनुक्रमे आर्या आणि अर्जवी असे आहेत. या दोन्ही मुलींवर अभिजीत चव्हाण यांचे खूपच प्रेम आहे. आपल्या मुली सोबत अनेकदा फोटो ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसत असतात. अनेकदा ते आपल्या मुलीसोबत कुठल्याही गोष्टीवर भाष्य करताना देखील दिसत असतात.

Team Beauty Of Maharashtra