प्रभास सोबत निहारिकाच्या लग्नाची होत आह चर्चा , पहा त्यांची छायाचित्रे आणि ती कोण आहे हे घ्या जाणून

प्रभास सोबत निहारिकाच्या लग्नाची होत आह चर्चा , पहा त्यांची छायाचित्रे आणि ती कोण आहे हे घ्या जाणून

बाहुबली सुपरहिट झाल्यापासून टॉलिवूड सुपरस्टार प्रभास यांचे लग्न हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. बाहुबली चित्रपटात त्यांच्या पत्नीची भूमिका साकारणारी अनुष्का शेट्टी यांच्याशी प्रभासचे नाव वारंवार जोडले जाते. अभिनेता प्रभास यांचे नाव अलिकडच्या काळात बर्‍याच अभिनेत्रींशी जोडले गेले आहे.

आता पुन्हा एकदा सुपरस्टार प्रभास यांचे नाव साऊथ च्या आणखी एका हसीनाबरोबर जोडले जात आहे. या अभिनेत्रीचे नाव निहारिका कोनिडेला आहे. आज आम्ही तुम्हाला निहारिका कॉनिडेला विषयी सविस्तर माहिती देणार आहोत.

निहारिका या टॉलीवूडमधील नामांकित अभिनेत्री आहेत. निहारिका यांच्या मागे एक प्रचंड चित्रपट पार्श्वभूमी आहे. निहारिका या सुपरस्टार चिरंजीवी आणि पवन कल्याण यांची भाची आहे. सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि राम चरण हेही निहारिका यांचे चुलत भाऊ आहेत.

प्रभास यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या लग्नाच्या सर्व बातम्यांना निहारिका यांनी अफवा म्हणून सांगितले. प्रभास यांच्या सोबत त्याच्या लग्नाची बातम्या त्यांनी फेटाळून लावल्या आहेत.

निहारिका म्हणाल्या की, मला माहित नाही, ‘कसेकाय माझ्या लग्नाच्या बातम्या चालू आहेत, माहित नाही अशा बातम्या कुठून येतात?

निहारिका यांनी त्यांच्या चित्रपट कारकीर्दीत आत्तापर्यंत फक्त 5 चित्रपट आणि 3 वेब सीरिज केल्या आहेत. पण सोशल मीडियावर त्यांची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. एकट्या इंस्टाग्रामवर निहारिका यांचे 12 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

बॉलिवूड जगाशी संबंधित अशा रंजक बातम्यांसाठी आमचे पेज नक्की लाईक करा.

Team Beauty Of Maharashtra