नववधू हृताच्या एक नाहीतर चार मंगळसूत्रांची रंगलीये महाराष्ट्र भर चर्चा

अभिनेत्री हृता दुर्गुळे फुलपाखरू या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. या मालिकेत तिने वैदेहीची भूमिका केली होती. या भूमिकेमुळे ती प्रसिद्ध झाली. 2019 मध्ये तिने सोनी मराठीचा सिंगिंग रियालिटी शो सिंगिंग स्टार होस्ट केला होता.

तिने स्टार प्रवाह वरील दूर्वा मधून छोट्या पडद्यावर आपले पदार्पण केले. या मालिकेने जवळपास हजार भागांचा टप्पा पूर्ण केला होता. तिची क्रेज पाहता मराठी अभिनेत्रींमध्ये सोशल मीडियावर सर्वात जास्त लोकप्रिय असलेल्या अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं.

आता तीन टेलिव्हिजन विश्वात सर्वात आकर्षक महिला 2018 या यादीत पहिले स्थान मिळवलं होतं .सध्या मन उडू उडू झालं या मालिकेत ती दीपिका देशपांडेच्या मुख्य भूमिकेत काम करत आहे. हृता ला जशी अभिनयाची आवड आहे तशीच ड्रायव्हिंग करायला देखील तिला फार आवडते. तिला वाचनाची देखील आवड आहे.

प्रतिक शहा आणि हृता यांनी 18 मे 22 रोजी मुंबईत गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाची मराठी चित्रपट सृष्टीत बरीच चर्चा होत आहे. चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता होती. पारंपरिक पद्धतीत लग्न करत त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहेत.

त्यांच्या लग्नाच्या फोटो सोबतच सध्या आणखी एका गोष्टीची चर्चा होत आहे. ती म्हणजे नववधू हृता च्या मंगळसूत्रांची. लग्नाला एक नाही तर एकूण चार मंगळसूत्र घातले होते. एक म्हणजे लग्नात प्रतीक ने हृताच्या गळ्यात विधिनिषी असलेले मंगळसूत्र घातले. हे मंगळसूत्र दोन वाट्यांच डिझाईन केलेले असुन पारंपरिक पद्धतीचं तिच हे मंगळसूत्र आहे.

या मंगळसूत्राच्या दोन्ही वाट्यांमध्ये हळदीकुंकू भरून हृता च्या गळ्यात घालताना दिसून आले आहे. दुसर मंगळसूत्र म्हणजे ऋताचे छोटे मंगळसूत्र आहे. हे मंगळसूत्र देखील पारंपरिक पद्धतीचे आहे.छोट्या मंगळसूत्रात एक छोटी वाटी दिसून येते. हृता चे तिसरे मंगळसूत्र म्हणजे मुहूर्त माणि काळ्या मण्यांनी भरलेला आणि मधोमध एक छोट्या सोन्याचा मणी या मुहूर्त मनी मध्ये दिसून येत आहे.

लग्नाच्या फोटोमध्ये हृताचे मुहूर्त मणी खूपच शोभून दिसतोय. चौथा मंगळसूत्र तिच्या गळ्यातल आणखी एक छोट मंगळसूत्र. पण हे छोटे मंगळसूत्र डायमंडच आहे. काळे मणी आणि मध्येच सिंगल डायमंड असे हे चार मंगळसूत्र हृताने तिच्या लग्नात परिधान केले होते. हृता या चारही मंगळसूत्र मध्ये खूपच सुंदर दिसत होती.

18 मे रोजी प्रतीक व हृताने लग्न गाठ बांधली आहे. लग्न सोहळा मुंबईतील पवई येथे थाटामाटात पार पडला आहे. हा लग्न सोहळा पारंपारिक पद्धतीने झाला. सकाळी मराठमोळ्या पद्धतीने लग्न सोहळा झाला असून संध्याकाळी रिसेप्शन देखील झाले.

नाकात नथ ,केसात पिवळी गुलाबाची फुले, गळ्यात हार, पिवळ्या- गुलाबी रंगाची साडी अशाप्रकारे सुंदर लुक मध्ये ऋता दिसत होती. लग्नमंडपात येताच हृता भावुक झाली. त्यांच्या लग्नसोहळ्यात मराठी तसेच हिंदी सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.

Team Beauty Of Maharashtra