‘तू तेव्हा तशी’ या मालिकेवर भडकला हा प्रसिद्ध अभिनेता

छोट्या पडद्यावर अनेक मालिका सुरू आहेत. मात्र, यातील अनेक मालिका या बंद होण्याच्या मार्गावर देखील आहेत. यातील तू तेव्हा तशी ही मालिका आता लवकरच बंद होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर तुझेच गीत मी गात आहे ही मालिका ही लवकरच बंद होणार आहे.
यासोबतच माझी तुझी रेशीमगाठ मालिका ही बंद होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, आता एका अभिनेत्याने मालिकेत काम करणाऱ्या दुसऱ्या अभिनेत्यावर अतिशय गंभीर रित्या टीका केलेली आहे आणि त्याला या मालिकेतून काढून टाकावे की काय असे देखील प्रेक्षकांनी म्हटले आहे. अनेकदा मालिकेमधील पात्र हे एक नेमक काय बोलतात हे ऐकायलाच येत नाही.
त्यांच बोलणे कान देऊन ऐकावे लागते. अनेक चित्रपट हे देखील असेच असतात. आपण कान देऊन ऐकले तरच आपल्याला समजते. अतिशय शांतपणे ते बोलतात. त्यामुळे मात्र ऐकायला काही येत नाही. अशा चित्रपटांना पाहण्यामध्ये अतिशय वेळ खराब होतो. आपण काही वर्षांपूर्वी रेनकोट हा चित्रपट पाहिला असेल.
रेनकोट चित्रपटांमध्ये अजय देवगन, ऐश्वर्या राय यांची भूमिका होती. या चित्रपटामध्ये अतिशय कमी संवाद होते आणि जे संवाद होते ते प्रेक्षकांना ऐकायलाच येत नव्हते. आता देखील एका मालिकेवर एका अभिनेत्याने टीका केली आहे. त्यांनी ही टीका केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. टीका करणाऱ्या अभिनेत्याचे नाव अस्ताद काळे असे आहे.
अस्ताद काळे याने अनेक मालिका चित्रपटातही काम केले आहे. आपल्या वेगळ्या शैलीसाठी तो ओळखला जातो. तो अनेकदा जाहीर रित्या कमेंट देखील करत असतो. त्यामुळे त्याच्यावर अनेक जण टीका देखील करतात. आता देखील त्याने एका अभिनेत्यावर थेट टीका केली आहे. सध्या छोट्या पडद्यावर तू तेव्हा तशी ही मालिका सुरू आहे.
या मालिकेमध्ये आकाश ही भूमिका आहे. आकाश ही भूमिका अभिनेता अशोक समर्थ यांनी केली आहे. अशोक समर्थ या मालिकेमध्ये बोलत असताना नेमके काय बोलतो ते कळतच नाही. अनेक प्रेक्षकांनी देखील हे सांगितले आहे. त्यामुळे अस्ताद काळे याने आकाशाचे संवाद होत असताना त्याच्याखाली सब टायटल लावावे, अशी मागणी केली आहे. कारण तो काय बोलतो हेच कळत नाही.
अस्ताद काळे याच्या पोस्टनंतर अनेक प्रेक्षकांनी देखील त्याला समर्थन देऊन आकाश काय बोलतो हे कळत नसल्याचे सांगितले आहे, तर आपल्याला याबद्दल काय वाटते आम्हाला नक्की सांगा.