‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील ‘बाबूजी’ आहेत जेठालालपेक्षा 4 वर्षांनी लहान, प्रत्येक एपिसोड मधून कमावतात इतका पैसा…

शोमध्ये बाबूजी म्हणजेच अमित भट्ट यांनी जेठालाल यांच्या वडिलांची भूमिका साकारली आहे, परंतु प्रत्यक्षात ते दिलीप जोसबी यांच्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहेत. दिलीप जोशी हे 51 वर्षांचे आहेत, तर अमित भट्ट हे 47 वर्षांचे आहेत. चला जाणून घेऊया बाबूजींच्या म्हणजेच अमित भट्ट यांच्या जीवना संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी
‘तारक मेहता का उलटा चश्मा’ हा एक उत्कृष्ट विनोदी कार्यक्रम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो लोकांच्या मनावर राज्य गाजवत आहे. या शो मधील सर्व पात्रांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. या शोचे प्रत्येक पात्र शोसाठी खूप महत्वाचे आहे.
शोमध्ये बाबूजीची भूमिका साकारणारे अमित भट्ट यांनीही आपल्या अभिनयाने लोकांच्या म नात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. यापूर्वीही अमित भट्ट बर्याच मालिकांमध्ये दिसले होते पण बाबूजींच्या व्यक्तिरेखेमुळे त्यांना खूपच लोकप्रियता मिळाली.
बाबूजी शोमध्ये जेठालालच्या वडिलांची भूमिका साकारतात, परंतु प्रत्यक्षात ते त्यांच्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. दिलीप जोशी हे 51 वर्षांचे आहेत, तर अमित भट्ट 47 वर्षांचे आहेत.
एका एपिसोडसाठी किती शुल्क आकारता: बॉलिवूड तडकाच्या म्हणण्यानुसार अमित भट्ट सलमान खान यांच्या चित्रपटात म्हणजेच ‘लवयात्री’ मध्ये दिसले होते. ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ हा शो 2 जुलै 2008 रोजी सुरू झाला, तेव्हापासून अमित भट्ट म्हणजेच बाबूजी शोमध्ये कायम दिसतात.
ते इतक्या दिवसांपासून या शोमध्ये दिसत आहेत की लोक त्याचा खरा चेहरा देखील विसरले असतील. मीडियाच्या रिपोर्टनुसार अमित भट्ट या शोच्या एपिसोडसाठी 70 ते 80 हजार रुपये घेतात.
अमित भट्ट लव्ह लाइफ:
अमित भट्ट हे विवाहित असून ते खूप रोमँटिक आणि समर्पित देखील आहेत. याचा अंदाज तुम्ही अमित भट्ट यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेऊ शकता. आता ते आपल्या पत्नीबरोबर असलेले व्हिडिओ आणि फोटो शेअर करत राहतात.
अमित भट्ट जुळ्या मुलांचे वडील आहेत. रिपोर्ट्सनुसार, अमित भट्ट यांची मुल ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या शोमध्ये ही दिसले होते.
गुजराती चित्रपटांमधे अमित भट्ट यांचे खूप मोठे नाव आहे:
मीडिया रिपोर्टनुसार, अमित यांना चित्रपट आणि मालिकांसोबत स्टेज शो करायलाही खूप आवडते. त्यांनी आतापर्यंत ‘आव तारी बैरी बतावू’, ‘गुपचूप-गुपचूप’, ‘परके पैसा लीला लहर’ आणि ‘चेहरा पर मारोरू’ यासारख्या प्रसिद्ध स्टेज शोमध्ये काम केले आहे.
तसेच, अमित भट्ट गुजराती सिनेमा मधील एक स्टार आहेत. त्यांनी बर्याच गुजराती चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका केल्या आहेत.
आमच्या पेजला नक्की लाईक करा.