ऋषी कपूर होते इतक्या कोटीचे मालक, रणबीर कपूरसाठी सोडून गेले काय?

ऋषी कपूर होते इतक्या कोटीचे मालक, रणबीर कपूरसाठी सोडून गेले काय?

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर याचे ३० एप्रिल रोजी मुंबईच्या एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. अनेक काळापासून ते कॅन्सरशी लढा देत होते. त्यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. ऋषी कपूरच्या यांनी मागे भलं मोठे कुटुंब सोडून गेले आहेत.

ऋषी कपूर यांचा जन्म मुंबई चेंबूर येथे १९५२ मध्ये पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे नाव ऋषी ठेवण्यात आले. राज कपूर यांच्या घरात जन्मलेल्या ऋषी कपूर यांना पृथ्वीराज कपूर यांचे विशेष प्रेम मिळाले.

पृथ्वीराज कपूर हे भारतीय थिएटर आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीत अत्यंत आदराचे नाव होते. पृथ्वीराज कपूर यांच्यानंतर ऋषी कपूर यांचे वडील राज कपूर यांनी चित्रपट इंडस्ट्रीची धुरा आपल्या हातात घेतली. ते प्रोड्युसर, डायरेक्टर होते. राज कपूर यांनी कृष्णा मल्होत्रा यांच्या लग्न केले.

ऋषी कपूर हे राज कपूर यांचे दुसऱ्या क्रमांक सुपूत्र होते. रणधीर कपूर आणि राजीव कपूर हे त्यांचे दोन बंधू होते. ऋषी कपूर यांनी तिघा भावांमध्ये सर्वाधिक नाव कमावले. तसेच चित्रपट सृष्टीत यशाची शिखरं पादाक्रांत केलीत. त्यांची गणना चॉकलेट हिरोमध्ये केली जात होती. ऋषी कपूर यांच्या दोन बहिणी ऋतू नंद आणि रिम जैन आहे. ऋतू नंदा यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले.

ऋषी कूपर याने २२ जानेवारी १९८० मध्ये नीतू सिंह यांच्याशी लग्न केले. दोघांनी एक डझन पेक्षा अधिक चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यांना रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी हे दोन मुलं आहेत. रिद्धिमाचे स्वतःचा ज्वेलरी ब्रान्ड आहे, तर रणबीर कपूर सुप्रसिद्ध अभिनेता आहे.

आपल्या ५० वर्षांच्या करिअरमध्ये ऋषी कपूर यांनी १०० पेक्षा अधिक चित्रपट केले आहेत. पत्रिका डॉट कॉमने दिल्लाय बातमीनुसार निधनापूर्वी त्यांच्या एकूण मालमत्तेची किंमत ३०० कोटी रुपये होती. यात घराशिवाय लक्झरी कार्सचा समावेश आहे.

आमचे पेज लाईक करा.

Team Beauty Of Maharastra