आई नर्गिस यांच्या पुण्यतिथीनिमित्त संजय दत्त झाला भावुक आणि सोशल मीडियावर केले हे खास चित्र शेअर व लिहिली ही गोष्ट

आई नर्गिस यांच्या पुण्यतिथीनिमित्त संजय दत्त झाला भावुक आणि सोशल मीडियावर केले हे खास चित्र शेअर व लिहिली ही गोष्ट

नर्गिस दत्त यांची काल 39वी पुण्यतिथी होती. त्या हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीच्या अभिनेत्री होत्या. आपल्या अभिनयाने त्यांनी लाखो प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले होते. नर्गिस यांचा बॉलिवूड अभिनेता संजय दत्त मुलगा आहे. आईच्या 39व्या पुण्यतिथीनिमित्त संजय दत्त यांना नर्गिस दत्त यांची आठवण झाल होती. त्यांनी आपल्या आईसाठी एक पोस्ट देखील लिहिलेली आहे.

संजय दत्त यांनी सोशल मीडियावर एक अतिशय खास चित्र शेअर करुन नर्गिस यांना श्रद्धांजली वाहिली आहे. संजय दत्त यांनी त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर आई नर्गिससोबत असलेला एक ब्लॅक अँड फोटो शेअर केला आहे. या चित्रात संजय दत्त खूप तरूण दिसत आहे. नर्गिस दत्तसोबत शेअर केलेल्या या चित्रासाठी संजय दत्त यांनी खूप खास कॅप्शनही लिहिला आहे. ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.

संजय दत्त यांनी या चित्रपटाच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तूम्ही आम्हाला सोडून आता 39 वर्षे झाली आहेत, पण मला माहित आहे की तूम्ही अजूनही माझ्याबरोबर आहात. काश तुम्ही आज आणि दररोज इथे माझ्या सोबत असता. मी रोज तुमची आठवण काढतो आणि तुझ्यावर खूप प्रेम करतो आई.’

सोशल मीडियावर आई नरगिससाठी लिहिलेला संजय दत्त यांचा हा मेसेज जोरदार व्हायरल होत आहे. बरेच सोशल मीडिया वापरकर्ते आणि त्यांचे चाहते या पोस्टवर आपला अभिप्राय देत आहेत.

विशेष म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नर्गिस दत्त यांचे 3 मे 1981 रोजी निधन झाले. नर्गिस यांनी बॉलिवूडमधील बर्‍याच चित्रपटांमध्ये चमकदार कामगिरी केली होती.

बाल कलाकार म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात 1935मध्ये ‘तलाश-ए-हक’ या चित्रपटाद्वारे केली. हिंदी सिनेमाच्या सदाबहार चित्रपट ‘मदर इंडिया’ मध्ये त्यांनी वयाच्या 28 व्या वर्षी एका वृद्ध महिलेची भूमिका केली होती, आणि ती चांगलीच गाजली.

नर्गिस यांच्या मदर इंडिया या चित्रपटाला 1958 मध्ये ऑस्करसाठीही नामांकन मिळाले होते. चार दशकांपर्यंत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार्‍या या नर्गिस यांना डॉक्टर होण्याची तीव्र इच्छा होती.

नर्गिस यांनी राज कपूर सोबत अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आणि त्यानंतर मार्च 1958 मध्ये नर्गिस यांनी ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त यांच्याशी लग्न केले. सुनील दत्तही त्यांच्या काळातील नामांकित कलाकारांपैकी एक होते.

अशाच माहितीसाठी आमचे पेज नक्की लाईक करा.

Team Beauty Of Maharashtra